श्री गुरुकथा

सिद्ध नामधारकांस सांगतो गुरुकथा 

ऐकता मिळेल मुक्ती, पावती गुरुपदा ।। धृ ।।

अथांग सिंधु अमृतापरि गुरुचरित्र हे 

दत्त बोध यांत वेद वाक्य जाण थोर हे

गुरुपदीं जयांस भक्ति त्यांस देती सर्वदा 

धर्म, अर्थ, काम, मोक्ष, सर्व सौख्य संपदा  ।।१।। 

उमापति, विरंची, विष्णु “दत्त” हे तिघे 

दत्त भक्ति भूवरील कल्पवृक्ष हा असे 

सर्व भाव सोडुनी जो अर्पिती गुरुपदा 

देव त्यांस तारतील सर्व हरुनी आपदा ।।२।।

भाव भक्ति ज्यापरी असेल प्रिती अंतरी 

कोटी, पोटी घालुनी चुकां गुरु क्षमा करी 

दैन्य, ताप, दुःख हारी तूं धरी हरि पदा 

स्पर्शता परीस लोह, हेम होय सर्वथा     ।। ३।। 

देव दैत्य यक्ष किन्नरादि वंदिती मुनी 

योगीराज श्रीसमर्थ दत्त श्रेष्ठ त्रिभुवनी 

पावतो त्वरीत भक्त आर्त साद घालता 

दत्त दत्त प्रितीने सदा मनांमध्ये वदा ।।४।।

दत्त मूर्तिमंत शांति अंतरी दया वसे

माय, बाप, बंधू वा सखा गुरु तुझा असे 

असे जिणे अधांतरी तयांस तोची रक्षिता 

एक श्रीसमर्थ दत्त पाय नम्र वंदिता ।। ५ ।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]