श्री गणेशायनमः

भाव भक्तिनें जो ध्यातो 

एकदंत त्या पावतो ।। धृ ।।

आदि विश्वाची उत्पत्ती 

वेद निर्मि गणपती 

कृपा दृष्टिने बघतो 

सर्व मांगल्ये अर्पितो ।। १ ।।

रिद्धी सिद्धी गजानन 

तुझा कार्यारंभी मान 

जैसा भाव तैसे देतो 

दास भक्तांचाही होतो ।। २ ।।

धांव पाव रे ओंकारा 

दीनानाथा लंबोदरा 

गोड नाम जो स्मरतो 

त्याचे हेत पुरवितो ।। ३ ।।

मला आपुले म्हणावे 

तुझे आलिंगनी घ्यावे 

ऐसी कृपा मी भाकतो 

पदी आशिष मागतो ।। ४ ।।

गुरुरूप विनायका 

माझी करुणा ही ऐका 

“गीत दत्तात्रेय” गातो 

दूर्वांगीते मी वाहतो ।। ५ ।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]