निरोप गीत (अ-५१)
भक्तजन सुखे असा संसारी
स्मरण करावे ध्यावे गावे, नाम सदा वैखरी ।।धृ.।।
मी नच गेलो तुमच्या मधुनी
अरुप रूपे मी वसे कर्दळवनी
स्मरता सन्मुख तत्क्षणी नयनी
येईन मी नरहरी ।। १।।
गुरुचरित्र मम वाङमय मूर्ति
पारायणावर ज्याची प्रीति
योग क्षेम नी ईच्छा पूर्ति
करेन मी नरहरी ||२||
औंदुंबर, वाडी, गाणगापुरी
विमल, मनोहर, निर्गुण सारी
तिर्थे असती मम अवतारी
सौख्य सरिते परी ।। ३।।
जिथे भक्तजन गाती भजने
तिथेच मजला सदैव असणे
प्रेम भक्तिने मज आकळणे
शरणांगत चरणावरी ॥४॥