मिळाला कुंभ सुवर्णाचा (अ-१८)

तोडिता वेल घेवड्याचा 

मिळाला कुंभ सुवर्णाचा     ।। धृ।। 

भिक्षेला गुरु जाता सदनी 

घरांत नेति आदर करुनी 

घेवडा भाजी देती भोजनी 

देतसे, ढेकर तृप्तीचा         ।। १।। 

वेल घेवडा तोडित वदले 

सात पिढ्यांचे दरिद्र गेले 

भाग्य तुझे हे, आज उदेले

आशीष हा अमुचा           ।। २।। 

गुरुरायाची सेवा करिता 

त्री तापातुन मिळे मुक्तता 

अक्षय आशीष जाण सुभक्ता 

शब्द अमृताचा                ।। ३।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]