कलि महिमा

(अध्याय २)

वंदूनी ब्रह्मा पुढती करितो, स्वये कलि गुणगान 

कलिचे श्रवण करा महिमान           ।। धृ।। 

सत्य युगाचे नसेल वर्तन

त्रेताला मी मुळांत छेदिन

द्वापारावर वरचढ राहिन

भिन्न तो राहिल मम अभिमान   ।। १।। 

प्रपंच-मत्सर दांभिक ते जन 

कलह द्वेष मनी विषयी चिंतन 

वृत्ति संचरे जनीं संहारक

भोगिती कर्माचे विंदान        ।। २।। 

हरि-हरांतिल भेद पाहतील

पापांचे घट असंख्य भरतिल 

दुष्कृत्यांचा सुकाळ होईल

सज्जना इथेच दंड महान      ।। ३।। 

परस्त्रीत पर द्रव्या हारक

मग्न सोडूनि पूजन तारक 

निद्राधिन ते निरंकुशी जन

सांडिती देव-धर्म अभिमान    ।। ४।। 

संत ऋषी मुनि करी देवार्चन

निश्चित जाणा माझे दुष्मन

धर्माचे मी करीन छेदन

क्रूर मी घालिन जगी थैमान     ।। ५।। 

ऐहिक सुख ते भोगील दुर्जन 

अन्न जलाविन राहिल सज्जन 

धि:कारुनी मी प्रभूचे बंधन

धरेवर करीन राज्य महान         ।। ६।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]