भक्तांचे कैवारी (तस्कर कथा) (अ-१०)

भक्तांचे श्रीगुरु कैवारी ! 

स्वये रक्षिती परोपरी ।। धृ ।।

फसवुनि विप्रा नेती काननी

तस्कर पळती तयास बघुनी 

यति वेषें तो स्वयें प्रकटुनी

सर्व पकडुनी तस्कर मारी ।। १ ।।

वृद्ध तस्करा भस्म देऊनी

लाव म्हणती रे भक्ता वदनी 

सभोवताली बघतां उठुनी 

विप्रा दिसती मृत सहकारी ।।२।।

तस्कर बोले अघटित घडले 

फसवुनी तुजला ज्यांनी वधिले

वधुनी तयांना, तुला उठविले 

कळे न होता कोण श्रीहरि ।। ३ ।।

कोण रक्षितो सांगा गुरुविण 

प्रेमे प्रतिपाळुन हे जीवन 

भक्तां दिधलें नव संजीवन 

पाय गुरुचे भवभय हारी ।।४।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]