आत्म निवेदन

सन्माननिय कवी श्री मधुकर सुळे उर्फ आमचे सर्वार्थाने जेष्ठ गुरुबंधु श्री मधुदादा सुळे यांनी श्री गुरुचरित्रातील लीलांवर आधारीत श्री गीत दत्तात्रेय लीहिण्याचा संकल्प त्यांनी मागील वर्षी श्री क्षेत्र गाणगापूर येथे श्री दत्तप्रभूंच्या सानिध्यात केला आणि बघता बघता उत्सुफुर्त पणे सहा सात महिन्यातच त्यांनी 26 गीतांचे ‘गीतदत्तात्रेय'” हे महाकाव्य लिहून काढल. जसे जसे गीत लिखाण होत गेले तस तशी त्यांची काव्यशक्ति बहरत गेली आणि प्रत्येक भेटीस ते लिहलेल्या गीतांपैकी एखादे गीत वाचून दाखवायचे व त्यावर अभिप्राय विचारायचे. त्यांच्या लेखनावर व कवित्वावर मी अभिप्राय द्यायचा म्हणजे सूर्याला दिवा दाखवल्या सारख होत आणि तसेच आहे.

         “दादा” ह्या शब्दातच एवढा मोठा आदर आणि मोठे पणा भरलेला आहे. कि दादांकडे बघताना मान अभिमानाने उंचावते आणि कुणालाही त्यांच्या समोर नतमस्तकच व्हावेसे वाटते. त्याला मी सुद्धा अपवाद नाही. दादा हे सर्वार्थाने मोठे आहेत. महान आहेत सत्पुरुष आहेत, संत पुरुष आहे आणि तरीही अत्यंत शांत व शालीन आहेत. त्यांचे कवीमन त्यांच्या काव्यातुन व्यक्त झालेल्या भावना ह्या त्यांच्या प्रचंड शक्तिचा परीचय देतात आणि त्याचे सर्व श्रेय ते त्यांच्या गुरुंना परम पुज्य श्री भाऊकाकांना देतात. हे त्यांनी त्यांच्या काव्यातुन रोजच्या वागण्यातून आणि गुरुभक्तितुन दाखवून दिल आहे, आणि म्हणूनच त्यांनी गीत दत्तात्रयाच्या सुरवातीस म्हटले आहे की “श्री गुरुचरणाला अनन्य भावे, शरण असे जावे / श्री गुरुरायाला प्रेम भक्तिने, हृदयी बसवावे” दादा खरोखर हे जगत आहेत आणि म्हणूनच ते नेहमी म्हणतात “गुरुकृपा हि केवलम्”.

          श्री दादांनी ह्या 26 गीतातून संपूर्ण गुरुचरीत्र आपल्या दृष्टीसमोर प्रकट केले आहे. गीत दत्तात्रेया मधील गणेश वंदने नंतर श्री सरस्वती वंदना करतात श्री दादा म्हणतात “ब्रह्मकुमारी विणाधारीणी देवी करी उपकार / विद्येचा मज प्रकाशुनी मती, घडवी साक्षात्कार.” श्री दत्त जन्मकथेच्या गीतात तर श्री दादांनी पांच कडव्यातील फक्त चार ओळीतच श्री दत्तजन्माची अनुभूती दिली आहे. त्यात दादा म्हणतात “पतिचरणाचे तीर्थ सतीने आतिथींवर शिंपले / त्रैलोक्याचे देव तिघेही बालरूप झाले। सत्व भंगण्या आले सतीचे, सत्व स्वतः हरले “दत्त” होऊनी घरी, त्रैमुर्ती रमले ॥” केवढी ही अफाट काव्य शक्ती! श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मकथेचे वर्णन करताना पण असाच उत्कट भाव विप्रस्त्री व गुरुंच्या संवादातुन प्रकट केलेला दिसतो. दादांनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्माची दिव्य कहाणी वर्णन करताना “पीठापुरीच्या विप्रागृही गुरुयेती श्राद्ध दिनी / माध्यांनिला येऊनी वदती “भिक्षा दे जननी” त्यावर विप्रस्त्री

म्हणते “सत्य वचन करी, सत्यची वाणी, बदला “मज जननी” सुपुत्र व्हावा तुम्हा सारखा होईल वंद्या जनी” प्रकटाया तीजलागी वदती “तथास्तु”संतोषुनी” आणि त्यानंतरचे श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्म, जीवन आणि अवतार कार्याच वर्णन ! केवळ अप्रतिम, असाच श्री दादांच्या प्रतिभेचा अविष्कार श्री नृसिंहसरस्वतीं जन्म कथेच्या गीतातुन दिसतो. “धरणीवर आज पहा नवल वर्तले। प्रणव शब्द उच्चारीत बाळ जन्मले।”

         दादा, तुम्ही एवढ प्रचंड कार्य करून ठेवले आहे कि त्याची थोडक्यात समिक्षा करणे केवळ असंभव. श्री गुरुचरित्र म्हणजे कांही कथा कादंबरी नव्हे! सत्याची अवहेलना होवू न देता, अल्पोति – अतिशयोक्ति न करता, घडलेल्या घटनांची प्रामाणिक पणे व क्रमवार गुंफण करून, त्या घटनारूपी फूलांच्या एक सुंदर सुगंधीत पुष्पहार बनवून तो दत्त भक्तांस अर्पण करण्यास सुपूर्द करणे म्हणजेच गीत दत्तात्रेय.

       झाडावर फूल सहजतेने उमलावं, क्षितिजावर इंद्रधनुष्य अवचित प्रकट व्हावं, तस सहजतेने हे “अंतरीतून प्रकटी करण” असल तरच त्यांचं मूल्य आहे आणि हे घडतं ते केवळ संतकृपेमुळे, गुरुकृपेमुळे, ईश्वरकृपेमुळे! इथे असच घडत आहे “गीत दत्तात्रेय’’! म्हणूनच श्री मधुदादा म्हणतात त्याप्रमाणे……

श्री चरणाला अनन्य भावे, शरण असे । 

जावे गुरुरायाला प्रेम भक्तिने, हृदयी बसवावे ।।

       कांही वर्षांपूर्वी श्री दादांनी केलेल्या संगीत सावली प्रमाणेच ह्या गीत दत्तात्रेयाला सुद्धा श्री दत्तभक्त डोक्यावर घेतील असा पूर्ण विश्वास वाटतो.

        “शुभं भवतु!” “अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!”

श्रीकांत मुकुंदराव श्रृंगारपुरे

बडोदे.

गुरुवार, दि. 30 जून 2016 – श्री योगीनी एकादशी

मो. 919427353


Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]