ChaitanyaGaatha

॥ श्री देवदत्त महाराजांची आरती ॥

आरती देवदत्ता । प्रेमानंदाने करिता

 शुभपद आराधिता । मिळे सुखाची सुबत्ता ॥धृ।।

 बायजीने बालपणी । स्तन्य पाजिले निर्गुणी

 दत्तकृपा गुळवणी । सप्तऋषींची कहाणी

 दत्तःसंग अंगी येता । झाली कृपेची सांगता ॥१।।

 सिद्धहस्त देवदत्त । झाले पहा कृपावंत 

धन्य झाले सर्व भक्त । कल्पवृक्षाची संगत 

संतोषाने मनी भजता । हरे भवभय चिंता ॥२॥

 देवदत्त एक ध्यान । सर्व निःसंग साधन

 संसाराचे पारायण । व्हावे पूर्णता विलीन 

अमृत नामगाता । परमानंदाची प्राप्तता ॥३।।

 देवदत्त देवदत्त । यात रमावे हे चित्त

 जीवन व्हावे अमृत । हेची आजन्माचे हित 

 कनवाळू भगवंता । भक्तहिताचा रक्षिता ॥४॥ 

-मधुकर सुळे, बडोदा


Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]