ChaitanyaGaatha

II श्री गुरुशरणाष्टक II

शंका कुशंका भवताप भीती

 यातून कैशी मिळणार शांती 

जरी वाटते प्रश्न कोणा पुसावे

 तरी देवदत्तापदी लीन व्हावे ॥१॥

 संकल्पसिद्धीत विकल्प भारी

 चित्तात चिंता मन होय वैरी 

जरी वाटते का, कुणी सोडवावे 

तरी देवदत्तापदी लीन व्हावे ।।२।। 

जरी दैव घाली अकस्मात घाला

 मनी वाटते देव कोठे पळाला, 

अशा दुष्ट वेळी कुणाला स्मरावे

तरी देवदत्तापदी लीन व्हावे ॥३।।

 कधी रुष्ट होऊनी देतात पीडा

 शनी, राहू, केतू करिती निवाडा 

कसे यातुनी मोकळे सांग व्हावे

 तरी देवदत्तापदी लीन व्हावे ।।४।।

 कधी पत्रिका दाखवी पितृदोष 

त्रिपुंड्रिक श्राद्धा सवे काळसर्प

 जरी वाटते श्राप हे दग्ध व्हावे

 तरी देवदत्तापदी लीन व्हावे ॥५।। 

कधी कामधंदा कधी संतती ती 

कधी कार्यसिद्धी, सुविद्या सुकीर्ती

 जरी वाटते कर्म सिद्धीस जावे 

तरी देवदत्तापदी लीन व्हावे ।।६।। 

कधी आदिभौतिक व्याधी उपाधी

 तुझ्या सर्व घेती हिरावून संधी

 जरी वाटते सौख्यसमृद्ध व्हावे

 तरी देवदत्तापदी लीन व्हावे ।।७।। 

अशी भावना ठेवी तू अंतरात

 तुझ्या पाठीशी हा उभा देवदत्त 

जरी वाटते का कृपापात्र व्हावे

तरी देवदत्तापदी लीन व्हावे ।।८।। 

जो देवदत्त मधुनाम मुखात घेतो ।

 तो जानकीस अतिप्रिय सुभक्त होतो ॥

 त्याच्यावरी श्रीगुरुदत्त कृपाही करितो । 

त्यांच्या पदी  मज जडो मधुरा-सूभक्ती ॥ 

– मधुकर सुळे, बडोदा


Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]