
II भक्तिगीत II
स्मरा स्मरा हो नित्य स्मरा, देवदत्त हे नाम स्मरा
या नामाने पुण्य जोडुनी, पाप आपुले भस्म करा ॥धृ।।
या नामामधी, गणेश शुभंकर
श्री विष्णू नि श्री शिवशंकर
परब्रह्म श्री दत्त दिगंबर
संगम झाला खरा ॥१॥
नामी विरल्या संत विभूति
जानकी दुर्गा स्वये भगवती
महालक्ष्मीसह वसे सरस्वती
शक्तीसंचय झरा ॥२॥
देवदत्त हे रूप मनोहर
स्वरूप लपला श्री मुरलीधर
नाद अनाहत जुळता सुंदर
सुटतील येरझारा ॥३॥
– मधुकर सुळे, बडोदा
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]