राजा दुष्यन्ताचें हे उत्तर ऐकून शकुंतलेला तर आश्चर्याचा धक्काच बसला . तिच्या आनंदावर एकाएकी विरजण पडले. तिच्या मस्तकावर वज्राघात पडल्याचा भास झाला ती हतबध्धच झाली. तिच्या जवळ कुठल्याही प्रकारची खूणगाठ नसल्याने ,राजा दुष्यन्तास तिची ओळख पटली नाही.
तो म्हणाला ,” उद्दाम झालेली नदी पाणी गढूळ करते तसे हिने कलंकित करणे उचित नाही . हिला घेऊन जा. हि माझी पत्नी नव्हे . हिचा स्वीकार करणे राजधर्मा विरुद्ध आहे. हे राजाचे म्हणणे ऐकून शाङ्गरवाला भयंकर संताप चढला . तो क्रोधाने लाल झाला आणि म्हणाला , “ हे आर्या , आपल्या पत्नीचा स्वीकार करीत नाहीस ? तुझ्यासारखा घातकी तूच ! “_ धि:क्कारित मी तुला नृपातें —”
शाङ्गरव : धि:क्कारित मी तुला नृपातें
वचन क्रोध मज आणि मनाते — II धृ II
चोरुनि करिशी जार कर्म ते
फसवुनि हिजला तव प्रीतिते
झिडकारशी तव कर्म कृत्य ते
नृपा प्रमत्ता लांच्छन गमते— II १ II
कुणा न पुसता जडवी नाते
कण्व मानती योग्य म्हणुनी ते
पाप तुझे परि तुला न स्मरते
कर्म कलंकील नृपा तुला ते— II २ II
योग्य सति ही पति सदनाते
जन्म दास्य तिज पति चरणाते
सोडुनि जातो सह दैवाते
सांभाळी वा सोडि योग्यते — II ३ II
धि:क्कारित मी तुला नृपातें
वचन क्रोध मज आणि मनाते — II धृ II
मृगये कारण वनांत येऊनि आश्रमात शिरला >>