अशाप्रकारे दोघांनीही आपल्या व्यथा प्रगट केल्यावर राजा दुष्यंताने कण्व महर्षिना साक्ष ठेवून शकुंतले बद्दल शपथ घेतली आणि लवकरच तिला आपल्या नगरांत नेऊन पट्टराणी करण्याचे वचन दिले. दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला . शकुंतलेची प्रफुल्लीत चर्या पाहुन तिच्या सख्या तिला स्नेहाने सतावू लागल्या , तिची चेष्टा करु लागल्या .शकुंतलेच्या डोळ्यात त्यांना भावनाश्रूं दिसले .
शकुंतला आपल्या सख्यांना म्हणाली ,”सख्यांनो, मला खरोखरच प्रेमाचा साक्षात्कार घडला आहे—
“ प्रीतिचा घडला साक्षात्कार “

शकुंतला :
प्रीतिचा घडला साक्षात्कार
मूर्तिमंत ही प्रीत प्रगटली I होऊनिया साकार II धृ II

हळूवारे नयनातुन शिरली
हृदय मंदिरी कशी संचरली
अंकुरली क्षणी बहरुनि फुलली
मनी घेई आकार ——II १ II

पदकमलाने केले पावन
तपोवनातिल हे वृंदावन
नृपमेघाने केले सिंचन
प्रीत फुले अनिवार —II २ II

अकल्पित हे घडले काही
खिळली दृष्टी शब्द तसेही
मुक्या मनाने व्यथा जिवाची
सांगु कुणा अनिवार —–II ३ II

जडली माझी प्रीत नृपावर
मनोमनी मी वरला नृपवर
सांग सखि मज योग्य न हे कर?
करी घ्याया संसार ——II ४ II

करात माझ्या ‘राज मुद्रिका ‘
हृदयी नृपाचे चित्र सुरेखा
सबाह्य अंतरी एकची हेका
सिंधूस नदी मिळणार —II ५ II

कमलपत्र हे करी घेऊनिया >>

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *