योग्य संधीचा लाभ घेऊन राजा दुष्यन्त एकदम पुढे आला आणि त्याने शकुंतलेभोवती फिरणाऱ्या भ्रमरास फेटाळून लावले. राजा असा एकाएकी आलेला पाहून सर्व ऋषि कन्यांना आश्चर्य वाटले. परंतु त्याच्या आगमनाने मात्र त्यांना कृतार्थ झाल्यासारखे वाटले. त्यांनी राजास बसण्यास आसन दिले. आणि त्याचे स्वागत करित त्या म्हणाल्या , “धन्य पूण्य चरण नृपा , आश्रमासी लागले”
प्रियंवदा :
धन्य पूण्य चरण नृपा ,आश्रमासी लागले
त्वदीय दर्शने मनी महर्षि सर्व तोषले II धृ II
स्वागतार्थ धन्य मानितात कण्व बालिका
करावया आतिथ्य धर्म मानितात सेविका
वसुंधरा पतीस स्वागतार्थ भाग्य लाभले
कृतार्थ धन्य जीवनी यथार्थ कर्म लाभले II १ II
कोणत्या कुलांत जन्मुनी सुवंश लाभला ?
आपला वियोग कोणत्या प्रजेस जाहला?
किमर्थ कष्ट घेऊनी वनांत का प्रवेशले?
कार्य कोणते आम्ही नसे मनांत जाणले —- II २ II
वृक्ष सावलीत बैसुनी परिश्रमा हरी
चरण पूजितां फले मधुर सेवना करी
घेऊनी फळे झणीहि येई तू शकुंतले
तुलाच सेवण्यास चरण योग्य आज लाभले II ३ II
हस्तिनापुरा मधील धर्मनिष्ठ भूपति
पाहता शकुंतला मनांत जागली प्रीति
लाजली पुरी मनी न पाय येथुनि हले
आदरावया तुम्हास भान नाहि राहिले II ४ II
राग नेणुनी शकुंतलेस या क्षमा करी
स्विकारुनी सखीस या सर्व काळजी हरी
कर्म कांड विघ्न रहित आश्रमात चालले
प्रवेशिता तुम्ही इथे मुनि सनाथ जाहले— II ५ II
कौशिक गोत्री श्रेष्ठ प्रतापी >>