
॥ श्रीदेवदत्त महाराजांची बावनी ॥
देवदत्त गुरू जयजयकार । बायजी आईचे सुकुमार ॥१॥
दत्तप्रभूची पूर्वापार । कृपा लाभली अपरंपार ॥२॥
बायजीने तव बालपणी । वर्तविली जी शुभवाणी ॥३॥
उर्वरीत मम कार्याची । धुरा चालविल हा माझी ॥४॥
या वाणीची फलः श्रृती । आज बहरली पहा किती ॥५॥
सप्त ऋषिंनी ध्यानात । येऊन केले भाकीत ॥ ६॥
देवदत्त या स्वरूपात । ओळख देति साक्षांत ॥७॥
गुळवणी महाराजांनी तुला । दिक्षा मंत्र असे दिधला ॥ ८॥
सिध्द करूनी सत्कार्याला । श्रेष्ठ गुरू पदी बसविला ॥ ९ ॥
गुरू माऊलीचा सहकार । लाभतसे बघ वारंवार ॥ १० ॥
कार्य पसरले दाही दिशा । पुरविती भक्तांच्या आशा ॥ ११ ॥
भक्त गर्जती जयजयकार । जयजय काका जयजयकार ॥ १२ ॥
करा आम्हांवरी बहु उपकार । याचक आम्ही करा स्विकार ॥ १३ ॥
भवभय भीतिच्या विळख्यात । भविष्य झाले बंदिस्त ॥ १४ ॥
प्रगति झाली कुंठीत । मार्ग दिसेना तिमिरांत ॥ १५ ॥
येता काकांचे जवळी । त्यास ‘सावली’ सापडली ॥ १६ ॥
समर्थ सेवक जो असतो । निर्भय जीवन तो जगतो ॥ १७ ॥
काका सांगती भक्तांना । इथेच सुटतिल विवंचना ॥ १८ ॥
देवदत्त हा कल्पतरू । भव सरितेचा जणू तारू ॥ १९ ॥
अखंड त्याचे स्मरण करू । भवसागर हा पार करू ॥ २० ॥
हिरमूसून जरी कुणी आला । हसत मुखाने परतविला ॥ २१ ॥
जोज्या वांच्छेने आला । संतोषाने मनी भरला ॥ २२ ॥
कूणास चिंता लग्नाची । संतती संपत्ती विद्येची ॥ २३ ॥
कुणास धंदा नोकरीची । सुख-संमृध्दी वा शांतिची ॥ २४ ॥
सर्व सुखाची परिपूर्ती । श्री चरणी या मिळायची ॥ २५ ॥
जरिकुणी फेऱ्यामधी आला । करणी, उताऱ्या मधी फसला ॥ २६ ॥
नजरे मधुन नच सुटला । वज्रपंजरी सापडला ॥ २७ ॥
सन्मूख येता कुणीव्यक्ती । भूत भविष्य वर्तविती ॥ २८ ॥
वास्तू मधल्या विसंगती । सांगुन विस्मीत ते करिती ॥ २९ ॥
त्वरित सुचविती सुसंगती । भाग्याला मग ये भरती ॥ ३० ॥
नवग्रहांची पूजा विधी । प्राक्तन सुविधा दर्शविती ॥ ३१ ॥
आग्रह काका मनी धरती । अडचणी भाग्याला करिती ॥ ३२ ॥
कालसर्प वा श्राध्द विधी । काका यावर भर देती ॥ ३३ ॥
शास्त्र शुध्द या मार्गाने । काका सोडविती प्रश्ने ॥ ३४ ॥
काकांच्या या संगतीत । सत्संगाची बरसात ॥ ३५ ॥
इथे भाग्य मग मोहरते । वसंत ऋतुसम दरवळतं ॥ ३६ ॥
इथे न थारा ग्रीष्माला । परमानंदी स्थिरावला ॥ ३७ ॥
संचित मागील जन्माचे । इहे जन्मी कसं पुसायचे ॥ ३८ ॥
मार्ग दाखविती सेवेचे । भक्त वत्सला स्मरायचे ॥ ३९ ॥
अमल भक्तिचे सिध्द स्थान । सर्व धर्म हे एक समान ॥ ४० ॥
इथे न कोणाचा अवमान । सर्वांभूती देवसमान ॥ ४१ ॥
देवदत्त या स्थानात । शरण येतसे जो भक्त ॥ ४२ ॥
तो काकांच्या सावलीत । परम कृपेच्या छायेत ॥ ४३ ॥
जयजय काका हरि-हरा । दत्त गणेशा शुभंकरा ॥ ४४ ॥
बायजी पुत्रा कृपा करा । अभय कृपा कर शिरी धरा ॥ ४५ ॥
आम्ही बालक अज्ञानी । केव्हा होऊ सज्ञानी ॥ ४६ ॥
तुमच्या नावाचे पुण्य । हेचि आमुचे कल्याण ॥ ४७ ॥
इतुके द्यावे वरदान । अनन्य दत्ता तुज शरण ॥ ४८ ॥
बावनी भाऊ दासाची । भावभक्तिने म्हणायची ॥ ४९ ॥
सुखशांतिच्या ग्वाहिची । अक्षर प्रचिती प्रेमाची ॥ ५० ॥
जयजय काका जयजयकार । भक्त जनांचे तारणहार ॥ ५१ ॥
प्रेम-भक्तिचा करा स्विकार । विनम्र वंदन वारंवार ॥ ५२ ॥
॥ इति क्षम ॥