
प. पू. श्री जानकी आईच्या उत्सवाच्या निमित्ताने ‘सावली’ या ग्रंथावर आधारित एक लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विषय होते (१) सावली च्या वाचनाने मला आलेला अनुभव व (२) सावली वाचून मला काय समजलें.
त्या स्पर्धेस भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्या सर्व लेखांचे रामनवमी दि. २५-०३-२०१८ ला “सावली सौरभ” पुस्तक रूपाने जनकीमंदिर, गणदेवी येथे प्रकाशन झाले व बक्षीस समारंभ झाला.
लोकाग्रहास्तव www.madhukalash.com वेबसाइटवर ते सर्व लेख उपलब्ध करून देण्यास आम्हाला आनंद होत आहे. आपण ह्या वेबसाईटवरील सर्व साहित्याचा भरपूर आनंद लुटाल व त्याचा प्रचार व प्रसार करून आपल्या नातेवाईक व मित्रमंडळींसहि लाभान्वीत कराल असा विश्र्वास आहे.
ह्या स्पर्धेचे परिक्षक प्रा. डॉ. निलांबर देवता यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. त्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन काहीही मोबदला न घेता या सर्व लेखांचे परिक्षण करून आम्हाला उपकृत केले.
आपले मार्गदर्शन व सुचना आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देतील.
धन्यवाद
मधुकलश टीम
Bhagyashree Pradhan