
।। उठा उठा हो श्री वेतोबा ।।
उठा उठा हो श्रीवेतोबा अरुणोदय झाला
राऊळ द्वारी सुभक्त गण हा दर्शनासी जमला ।।धृ।।
हाती घुंगरु काठी पायी करकरती चपला
विश्वहितास्तव विश्वमभर तुं रात्रीभर फिरला
दमुनी भागला म्हणुनी तुझांका डोळा रे लागला ।।१।।
रवी किरणांनी हेमकणांची उधळण ही केली
पुष्पांनी बघ उमलुनी धरती सुगंधीत केली
तुज सुखवाय सौरभ त्यांचा पवनाने वाहिला ।।२।।
पक्षीगणांनी किलबील रुपे वेदस्तुती केली
पदकमलांचे दर्शन घेण्या गगनी भिरभिरली
हिरमुसुनी ती झाडावरती करिती रे गलबला ।।३।।
कर्मारंभी पूजन करण्या जमले भक्तगण
अमृतमय हे जीवन करणे घेऊनिया दर्शन
क्षमा करावी जनकल्याणा जागविले तुजला ।।४।।
<< श्लोक आरवली आहे माझी >>
Click to rate this post!
[Total: 3 Average: 5]
