Sangeet Sawali
https://www.madhukalash.com/wp-content/uploads/2018/03/7.Smara-ho-Janaki-Durgeshwari.mp3?_=1

स्मरा हो जानकी दुर्गेश्र्वरी

स्मरा हो जानकी दुर्गेश्र्वरी,
जिच्या कृपेची सावली राहो, सदैव भक्तांवरी ।।धृ ।।

प्रेम भक्तिची असे भुकेली
निःस्वार्थावर पूर्ण भाळली
माया, ममता आणि सावली
देईल दुर्गेश्र्वरी ।।१।।

हीच जगाची असे माऊली
सर्वांची कुलस्वामिनी झाली
भक्ता संकटी, मनीं पाझरली
रक्षण त्यांचे करी ।।२।।

भक्तांचा तिज विरह नावडे
भक्त संगती तिला आवडे
शुद्ध भक्तिवर तिचा जीव जडे
त्यांची सखी सोयरी ।।३।।

जानकी भक्ति जणू उपकार
सदैव लाभे तिचा सहकार
भोळा भाव तिला प्रिय फार
होईल कैवारी ।।४।।

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *