लगबग लगबग निघे म्हातारी
जंगला मधून जाई लेकीच्या घरी ॥धृ॥

वाटे मध्यें वाघोबाची भेटली स्वारी
म्हणे आज शिकारही भेटली बरी ॥१॥
बघ वाघोबा मी आहे दुबळ्याच भारी
मज खाशी तरि तुझे पोट न भरी ॥२॥
तूप-पोळी खाण्या जाते लेकीच्या घरी
येते लठ्ठ होऊन मी, खुशाल मारी ॥३॥

फसवुनी वाघोबाला जाई म्हातारी
येई कुही ओरडत कोल्हा समोरी ॥४॥
कोल्हा म्हणे म्हातारीला भेटली बरी
उपवास सोडतो मी तुझ्याच वरी ॥५॥

कोल्होबा कोल्होबा, मी दुबळी भारी
मज खाशी तरी तुझे पोट न भरी ॥६॥
तूप-पोळी खाण्या जाते लेकीच्या घरी
येते लठ्ठ होऊन मी खुशाल मारी ॥७॥

फसवुनी कोल्होबाला निघे म्हातारी
खाऊन पिऊन जाडी झाली लेकीच्या घरी ॥८॥
भोपळ्यांत बसुनी जा आई तू घरीं
लोक बोलणे म्हातारीला देऊन करी ॥९॥

टुणटुण भोपळा हा पळतो भारी
म्हातारीची आंत बसे खुशाल स्वारी ॥१०॥
पळणाऱ्या भोपळ्याला कोल्होबा धरी
फसवुनी म्हातारे कां चालली घरी ॥११॥

इतक्यांत वाघोबाची येतेस फेरी
आता मात्र घाबरुनि जाई बिचारी ॥१२॥
म्हातारीला एक युक्ती सुचली बरी
म्हणे शिर कोणी खावे दोघां भितरी ॥१३॥
वाघोबाची-कोल्होबाची जुंपले मारामारी
म्हातारीच्या डोक्याचे ते दोघे मानकरी ॥१४॥

इतक्यांत भोपळ्यांत बसे म्हातारी
टुण टुण पळ म्हणे , आपुल्या घरी ॥१५॥

पळरे भोपळ्या टुणुक टुणुक………..

Click to rate this post!
[Total: 3 Average: 4.3]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *