स्वामी आठ रूप झाले (अ-४६)

सदगुरु आठरूप झाले 

साता ठाई, गेले तरिही, मठांतरी दिसले  ।।धृ।।

दिपावलीचा येता शुभ दिन

भक्त विनविती विनम्र होऊन

सदन करावे अमुचे पावन

लावुनि पद कमले  ।।।१।। 

तुम्ही लाडके मला भक्तगण

सात जणांना कसा तोषविन!

तुम्ही सोडवा माझी अडचण

भक्त मनीं हिरमुसले ॥२॥

परि सांगती एकेकाला

निश्चित येईन तुझ्या घराला 

गुप्त ठेव तूं या वचनाला

भक्त मनी तोषले ॥३॥

आठ रूप झाले यतिवर

पूजा स्विकारुनि देति श्रीयावर 

कृपा करिती गुरु सर्वांवर

मठांत ही वसले    ।।।४।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]