श्रीदत्त जन्म कथा (अ-४)

पतिचरणाचे तीर्थ सतीने अतिथींवर शिंपले 

त्रैलोक्याचे देव तिघे ही बाळरूप झाले         ।। धृ ।। 

पतिव्रतेच्या सामर्थ्याची कीर्ति दरवळली 

सावित्री, पद्मजा, गिरिजा, मनांत घाबरली 

पतिदेवांना सत्व भंगण्या, देविंनी धाडीले          ।।१।।

तीन अथिती हरिहरब्रह्मा सती गृही येती

द्यावे इच्छित भोजन म्हणुनि सत्व तिचे बघती 

सत्वर त्यांचे पाट मांडुनि चरण तिने पूजिले        ।।२।।

मोहक पाहुनि रूप सतीचे देव तिघे भाळले 

“विवस्त्र होऊनि पान आमुचे वाढ”, तिला वदले 

अवमानिशीं त्या क्षणी जाण तूं सत्व सती भंगले    ।।३।।

पतिवचनाचा भंग होतसे जरि अतिथी फिरले 

मनोमनी पतिचरण वंदूनि वस्त्र दूर केले 

अतिथी बाळक मानुनी सतीने तीर्थोदक शिंपले       ।।४।।

सत्व भंगण्या आले सतीचे, सत्व स्वतः हारले 

“दत्त” होऊनी अनसुये घरी, त्रयमूर्ति रमले 

धन्य सतीच्या पुण्याईला, त्रिवार वंदियले             ।। ५।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]