रावण दर्पोक्ती (अ-६)

सुपुत्र लंकाधिपती असतां 

कां करिशी चिंता, राजमाता ।। धृ ।।

सुरवर माझे बंदि असता 

नवग्रहाते पदी तुडविता 

याही आज्ञा मधे वागता

ऐसी रावण बाहुत सत्ता          ।।१।।

रवि, शशि, मंडळ वचनि राहता 

विधि-हरि-हर मज पळती बघता 

मी धरतीचा भाग्य विधाता 

दशाननाची ऐसी योग्यता          ।। २।। 

मृणमय शिवलिंगा कां पुजिता 

मम भाग्याची दिसे उणिवता 

कैलासच मी देतो, माता 

करावया तव व्रतां सांगता           ।।३।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]