रजक कथा (अ-९)

गुरु चरणी जो अर्पिल तनमन 

भवभय हारुनि होईल पावन ।। धृ ।।

रजक प्रोक्षितो गुरुचे अंगण 

विनम्र भावे करितो वंदन 

ठाव सदोदित देई दयाघन

पदकमलाचे व्हावे धुलिकण ।।१।।

पाहूनी रजकाची दृढ भक्ती 

संतोषुनी त्या गुरु बोलती 

“म्लेंछ” कुळीचा राजा होऊनी 

सुखे नांदशिल इच्छीत भोगुन ।।२।।

झालो जरी मी पुढती नृपती 

मला न व्हावी तुमची विस्मृती 

नकोस देऊ पतिता लोटुन 

देई स्मृति या दासा दर्शन ।।३।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]