पतिव्रता महिमा (अ-३१)

म्हणावे पतिव्रता तिजशी,

तनमन अर्पुनि, सदैव सेविल, जी पति चरणाशी  ।। धृ।। 

सदा प्रफुल्लीत मनांत राहुन 

पति आज्ञेचे करील पालन

देवा परि पति हृदयीं पूजुन 

पतिचे चरण तीर्थ प्राशीं      ।। १।। 

सुख दुःखहि ते अपुले मानुन

समृद्धची करी पतिचे जीवन

पति प्राणाहून प्रिय अति मानुन 

वावरे पति सावली जैशीं        ।। २।। 

पति सन्मुख सौंदर्य प्रसाधन

पति नसता वैराग्य आचरण 

करी सदोदित अतिथी पूजन 

पतिचा धर्म वंद्य सतीशीं       ।। ३।। 

असे सतीचे असता वर्तन 

देवहि सतीच्या होती आधिन 

सती आझेंने चाले त्रिभूवन 

वंद्य स्त्री सुरवर-मुनी-ऋषिशीं      ।। ४।। 

पतिव्रतेचे घेता दर्शन 

पापीं होईल क्षणांत पावन 

पद स्वर्गाचे कुळास मिळवुन 

धन्य ती होईल सती ऐशीं          ।। ५।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]