नंदी नामे विप्र (अ-४५)

विप्र एक तो नंदी नामे, करितो शिव पूजन                          

कवने अर्पूनी शिवा पूजितसे, गाऊनि गुणगान ।।धृ।।

कवने त्याची शिवभक्तिची, निर्मळ प्रेमाची 

जनांत त्याची कीर्ति पसरली, लीला श्रवण्याची 

लोक सांगति विनवून त्याला, स्वामीवरी करी कवन 

नरस्तुति नच कधीच करणे, हे माझे वचन      ।। १।। 

असे बोलुनि नंदी करितो, शिव पूजा ध्यान 

लिंगा वरती स्वामी दिसती, नकळत करी पूजन 

कशास माझी करितो पूजा, मी नच शिव जाण 

क्षणांत त्याला सत्य उमजले, स्वामीच शिव म्हणुन ||२||

शरण जाऊनि, बोले त्यांना, नर रूपी नारायण 

भ्रम निरसन झाले माझे, गाईन गुरु वर्णन 

गुरु लीलेचे कीर्तन करणे, कवनातुन छान 

अशीच सेवा नित्य घडावी, द्यावे वरदान      ।। ३।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]