गोकर्ण महात्म्य (अ-६ )

चतुर्विध मुक्ति सोपान 

क्षेत्र हे शिवगोकर्ण महान ।। धृ ।।

घोर तपस्या करी दशानन

तंतुक बनवी तोडुनी आनन 

चौप्रहराचे करितो गायन

भक्तिने नवरस युक्त प्रधान ।।१।। 

कर्पूर भुलला भक्ति पाहुन

आत्मलींग दे प्रसन्न होऊन 

“पूजिता लाभे तुला देवपण”

रावणा प्रभु देई वरदान ।।२।। 

नारद सांगे नारायण

“चिरंजीव हा होईल रावण ” 

रक्ष रक्ष गा, आता त्रिभुवन

मुकुंदा अघटित हे संधान ।। ३ ।।

बटू वेषे पाठवी गजानन

रावण बोलें बाळ ब्राह्मण

आत्मलिंग घे करात उचलुन 

जोवरी करितो संध्या स्नान ।। ४ ।।

त्रिवार पाचारुन गजानन

भूवरी ठेवि विष्णुः स्मरुन

सुरवर बघती मनी संतोषुन 

वंदिती ज्योतिर्लिंग महान ।।५।।

क्षेत्र धरेवर जणूं नंदनवन 

दर्शन मात्रे होईल पावन 

सौख्य शांति दे प्रभू दयाघन

वंदिता लाभे मोक्ष प्रदान ।। ६ ।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]