मधुकलश!
प्राचीन पौराणिक कथेमध्ये देवासूर सग्रामात, मेरु पर्वत धुसळून त्यातून विष निघाले होते. दुर्दैवाने देवांच्या वाट्याला विष आले परंतु विष्णूने मोहिनी स्वरूप घेवून असुरांकडचे अमृत देवांना प्राप्त करुन दिले. हे अमृत पिवून देव अमर झाले, व आपल्या सारख्या सामान्य मानवासाठी शास्त्रात पंचामृताची शिदोरी देवून गेले. सामान्य पंचोपचार विधीमध्ये दूध, दही, तूप, साखर, व मध आवश्यक असून हि पाचही अमृतमुल्य असून त्याचा अभिषेक व प्राशन प्रत्येकाचे कल्याण करतो. पंचामृतांतर्गत मधला सविशेष महत्व आहे. त्या बद्दल.

मधु वाता ऋतायते मधुं क्षरन्ति सिन्धवः । माध्वीर्नः सन्त्वोषधीः
मधु नक्तुतोषसो मधुमत्पार्थिवं रजः । मधु द्यौरस्तु नः पिता
मधुमान्नो वनस्पतिर्मधुमान् अस्तु सूर्यः । माध्वीर्गावो भवन्तु नः

मधुकलश ह्या वेबसाईट द्वारा अमृताहुनी गोड असणाऱ्या ईश्वराचेनाम विविध रुपाने जनमाणसापर्यंत पोहोचवण्याचा असा आमचा विनम्र असा प्रथमच प्रयास आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे राणीमाशी व इतर माशांनी एकत्र केलेला मध शुद्ध, सात्विक व मधुर असतो. परमपूज्य श्री मधुकर सुळे यांना स्वतःच्या नावाप्रमाणे राणी माशीचे कार्यकरुन ओवीबद्ध संतचरित्रे, स्तोत्रे, बावन्या व आरत्यांची रचना करुन भरपूर मधुर मध गोळा केला व त्याचे वाचन, मनन व पारायण करणाऱ्या असंख्य मधमाश्या निर्माण केल्या. ज्यांची स्वानुभावारुपी मध पण या कलशात संग्रहीत करण्यात आले आहे.

मधुकलश हा असा विविध गोडीचा संग्रह असून त्याचा स्वाद घेणार्यांचे जीवन निःशंकपणे कृतकृत्य होते. श्री मधुकर सुळे यांच्या प्रस्तुत साहित्यरचना जश्याकी बालगीते, नाट्यगीते, संगितीका, स्फुटगीते, वात्रटिका, गीतशाकुंतलसंगीत सावली चा समावेश पण या कलशात आहे.

संगीत सावली

 

श्री देव वेतोबा कवन सुमने